
Summary
नवी मुंबईतील कामोठे येथे सिलिंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली.
या दुर्घटनेत माय-लेकीचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन सदस्यांना वाचवण्यात यश आले.
आग सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली होती.
नवी मुंबईतील कामोठेत एका सोसायटीत सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत माय-लेकीचा होरपळून मृत्यू झाला.सेक्टर 36 मध्ये आंबे श्रध्दा सहकारी सोसायटीतीली दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. हे लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. जवानांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरु केला.आंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती.