
नवी मुंबई : सलग तीन वर्षे राज्यातून पहिल्या आणि देशात तिसऱ्या व दुसऱ्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या नवी मुंबई शहराने पुन्हा एकदा स्वच्छता स्पर्धेत बाजी मारली आहे. यंदा स्पर्धेत बदललेल्या गुणांकन पद्धतीमुळे वारंवार क्रमांक पटकावणाऱ्या नवी मुंबई शहराचा सुपर स्वच्छ लीगमध्ये समावेश झाला आहे. राज्यातून समावेश होणारे नवी मुंबई हे एकमेव शहर ठरले आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या शिरपेचात पुन्हा एकदा सुपर लीगचा तुरा खोवला गेला आहे.