esakal | नवी मुंबईत डेंग्यूचा प्रादुर्भाव? Dengue
sakal

बोलून बातमी शोधा

dengue

नवी मुंबईत डेंग्यूचा प्रादुर्भाव?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सानपाडा : नवी मुंबई (Navi Mumbai) शहरात आतापर्यंत फक्त नऊ रुग्णांना डेंग्यूची (dengue patients) लागण झाली आहे. मात्र एमएमआरडीए (MMRDA) क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिका प्रशासनाने (navi mumbai municipal) विशेष खबरदारी (precautions) घेण्यास सुरुवात केली आहे. या महिन्यांत सुमारे ४० लाख तपासण्या करून डेंग्यूच्या डासांच्या सुमारे पाच हजार अळ्या नष्ट केल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दीड पट रुग्ण अधिक वाढतील ; तज्ज्ञांचा अंदाज

मात्र आता शहरात डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. या रुग्णांना जरी डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले नसले तरी त्यांची लक्षणे डेंग्यू सदृश आहेत.त्यामुळे आरोग्य विभागाने कीटकनाशक फवारणी आणि धुरीकरणावर व डेंग्यूच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यावरभर दिला आहे. चौकट- गत दोन आठवड्यात डेंग्यूचे संशयित ७५ रुग्ण आढळून आले आहेत. डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये सुमारे ६७ हजार घरांची तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: ‘कोरोना’ मंदावला पण डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतोय; जळगावा आहेत इतके रूग्‍ण 

तसेच आरोग्य विभागाने २७ सप्टेंबरपासून आतापर्यंत सुमारे एक हजार २०० व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेतले आहेत. त्यापैकी ५२४ व्यक्तीं या डेंग्यूच्या रुग्णांच्या संपर्कात होत्या, तर ६६७ व्यक्तींना ताप आला होता. त्यांच्यापैकी ७५ जण संशयित डेंग्यू रुग्ण आहेत. संशयित रुग्णांच्या सभोवतालच्या परिसरातील किमान १०० घरांमध्ये जलद ताप सर्वेक्षण करून डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्यात येत आहेत.

"आपल्या घरात व आजूबाजूच्या परिसरात पाणी साचून डास उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी नागरिकांनी घ्यावी. पाणी साठवण्याची भांडी, टाक्या व ड्रम नियमित रिकामे करावेत आणि आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळावा. रुग्ण संशोधन किंवा डास उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे."

- अभिजित बांगर (मनपा आयुक्त)

loading image
go to top