esakal | नवी मुंबई : परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक | Job cheating
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

नवी मुंबई : परदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दुबईमध्ये (dubai) सिमन पदावर नोकरीचे आमिष (job decoy) दाखवून एका टोळीने दहापेक्षा जास्त बेरोजगार तरुणांकडून (unemployed boys) दीड-दोन लाखांची रक्कम उकळून (money fraud) आपले कार्यालय बंद करून पलायन केल्याचे उघडकीस आले. टोळीतील चौघांविरोधात सीबीडी पोलिसांनी (CBD police) गुन्हा दाखल (FIR) केला आहे.

हेही वाचा: राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे नोकरीत कायमत्वासाठी आझाद मैदानात धरणे

युसुफ आगा, सुनील चौहान, शैलेशकुमार आणि पूजा अशी गुन्हा दाखल केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांनी मार्चमध्ये सीबीडी सेक्टर-११ मधील फाऊंडेशन टॉवर इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सिमन शिपिंग सर्व्हिस नावाने कार्यालय थाटले होते. सिमन पदावर जागा उपलब्ध असल्याची जाहिरात केली होती. त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळले.

विमान सेवा सुरू झाल्यानंतर त्यांना करारनाम्यानुसार कामाच्या ठिकाणी पाठविण्याचे तसेच कराराची प्रत, विमानाचे तिकीट सोबत देण्याचे आश्वासन दिले होते. जूनमध्ये काही तरुणांनी कार्यालयात जाऊन त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचे फोन बंद होते. त्यानंतर तरुणांनी सीबीडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

loading image
go to top