

Navi Mumbai Pre School
Esakal
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने चालू शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी सुरू माध्यमाच्या बालवाड्या करण्याचा घेतलेला निर्णय मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेविरोधातील गंभीर पाऊल असल्याचा आरोप करत मराठी अभ्यास केंद्राने या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. मातृभाषेतून शिक्षणाची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच राज्याच्या मराठी भाषा धोरणात करण्यात आली असतानाही इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने मराठी शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा भाषा अभ्यासकांनी दिला. Navi Mumbai Pre School Shift to English Opposes National Education Policy