जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ दोघांनी केलेल्या गोळीबारात एपीएमसी मार्केटचे ठेकेदार राजाराम टोके (४८) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून कचरा उचलण्याच्या वादातून हल्ला झाल्याचा अंदाज आहे.
घाटकोपर येथे राहणारे राजाराम टोके यांच्याकडे एपीएमसी मार्केटमधील कचरा उचलण्याचा ठेका आहे. शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या पालिकेच्या विभाग कार्यालयात ते कामानिमित्त आले होते.