
Latest Navi Mumbai News: नवी मुंबई्च्या सानपाडा परिसरात शुक्रवारी सकाळी गोळीबाराचा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात घबराट उडाली आहे. एका दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी पाच ते सहा राऊंड गोळबार केला. यानंतर ते फरार झाले आहेत. या गोळीबारात एक जण जखमी झाला असल्याची माहिती आहे. भर दिवसा नवी मुंबईच्या सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरात गोळीबार घडल्यानं, परिसरातील नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. प्रकणानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु केला आहे.