
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) लवकरच पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे, आणि त्याच्या भव्य उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. काही महिन्यांतच हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, आणि सध्या विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे काम वेगाने सुरू आहे. नुकताच इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने या मेगा प्रकल्पाच्या अंतर्गत भागाची पहिली झलक दिली आहे, ज्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील सर्वात प्रगत विमानतळांपैकी एक कसे असेल याची कल्पना येते.