

NMIA Summer Schedule
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आपले पहिले उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले आहे. हे वेळापत्रक २९ मार्च ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहील. या वेळापत्रकानुसार, आता या विमानतळावरून देशभरातील ४६ शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असेल. या नवीन वेळापत्रकात ३० नवीन देशांतर्गत मार्गांचा समावेश करण्यात आला असून, यामुळे प्रवाशांना देशभरातील प्रमुख शहरे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांशी अधिक सुलभ जोडणी उपलब्ध होईल.