esakal | नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या: एकनाथ शिंदे
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या: एकनाथ शिंदे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या: एकनाथ शिंदे

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबईः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाच्या गाडीचा वेग मंदावू न देण्याची दक्षता घेण्यात आली. यामुळेच राज्यात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे 61 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्‍यात सुरू आहेत. यातीलच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रूजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. 

हेही वाचा-  New Year 2021: नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या स्वागतासाठी मुंबई पोलिस सज्ज

या विमानतळाला हिंदुसदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला आत्मभान देण्याचे काम बाळासाहेबांनी केले. मराठी माणसाला उत्तुंग झेप घेता यावी, यासाठी त्याच्या पंखात बळ भरण्याचे काम बाळासाहेबांनी केले. त्यामुळे अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हा त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणीही नगरविकास मंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navi Mumbai International Airport give name Balasaheb Thackeray eknath shinde demand

loading image