Navi Mumbai Airport: मुंबई विमानतळाचा ताण नवी मुंबई पेलणार का? अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे गंभीर प्रश्न निर्माण

Mumbai Airport: अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे मुंबई विमानतळाचा ताण नवी मुंबई पेलणार का, असा गंभीर प्रश्न निर्माण केला जात आहे.

Navi Mumbai International Airport
Navi Mumbai International Airport Sakal
Updated on

नवी मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल एकच्या पाडकामामुळे ऑक्टोबर महिन्यापासून सुमारे एक कोटी प्रवाशांचा आणि उड्डाणांचा मोठा भार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्ग केला जाणार आहे; मात्र सध्याची नवी मुंबई विमानतळावरील प्रत्यक्ष परिस्थिती पाहता, हा अतिरिक्त ताण पेलण्यास हे विमानतळ खरोखरच सक्षम आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या विमानतळ परिसरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com