

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या देशांतर्गत नेटवर्कचा विस्तार केला आहे. यात नऊ नवीन गंतव्य स्थानांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील मोपामार्गे अगात्ती, दरभंगा, गुवाहाटी, जळगाव, जोधपूर, रांची, बागडोगरा, सिंधुदुर्ग आणि उदयपूर या शहरांचा यात समावेश आहे. नवीन हवाई मार्गामुळे प्रादेशिक संपर्क यंत्रणा अधिक मजबूत होण्यासोबतच पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.