

Navi Mumbai International Airport
esakal
Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून (२५ डिसेंबर २०२५) व्यावसायिक उड्डाणांसाठी सुरू होणार असून, यामुळे प्रवाशांसाठी प्रवास सुलभ होणार आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा विमानतळ प्रकल्प प्रत्यक्षात उतरत असताना, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील रहिवाशांसाठी विमानतळापर्यंत पोहोचण्याचे मार्ग कोणते असतील, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.