

Hyderabad High Speed Train
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अधिक गतीमान प्रवासी सुविधा देण्यासाठी हैदराबादहून मुंबईला जोडणारी हायस्पीड ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहेत. केंद्र सरकारने या प्रकल्पाला तत्वतः मान्यता दिल्याचे समजते. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमार्फत या हजारो कोटी खर्च असणाऱ्या प्रकल्पाचे काम पाहिले जाणार आहे.