
Navi Mumbai Airport
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे येत्या ८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मात्र त्यानंतर विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिसेंबर महिन्यापासून प्रादेशिक आणि राष्ट्रीय प्रवासी सेवा सुरू होतील, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. उद्घाटनानंतर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी सुमारे ४५ दिवस हे विमानतळ सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.