

CCTV footage captures armed robbers looting a jewelry shop in Navi Mumbai during broad daylight, triggering panic and viral outrage on social media.
esakal
CCTV Footage of jewellery Shop Loot at Navi Mumbai : नवी मुंबईतील सीवूड्समध्ये सोन्याच्या दुकानावर दरोडा पडला आहे. बुरखा घालून आलेल्या तिघांनीणि बंदूक दाखवून सोन्याचं दुकान भरदिवसा लुटलं आहे. दुकानामधील सीसीटीव्हीत ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार दुकान लुटण्यासाठी एकूण चारजण आले होते. त्यापैकी तीन जण हे बुरख्यासह दुकानात शिरले, तर चौथा दुकानाबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबला होता. आतमध्ये गेलेल्या तिघांनी दुकानदाराच्या डोक्याला बंदूक लावली आणि दागिने गोळा करणे सुरू केल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
या दरोडयाची पोलिसात तक्रार दाखल झाली आहे आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलिस या दरोडेखोरांचा शोध घेत आहे. या दरोडेखोरांना दरोडा टाकण्याआधी दुकानाची रेकी केली असल्याची जाणवत आहे.
कारण, ज्या नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी हा दरोडा टाकला, त्यावरून त्यांना दुकानातील परिस्थितीची संपूर्ण माहित होती, हे दिसते. तर या धाडसी दरोड्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी श्वान पथकाच्या मदतीने दुकानाच्या परिसरातही तपास केला. नागिरकांनी परिसरात पोलिसांची गस्त वाढवली जावी, अशी मागणी केलेली आहे. या सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक होईल, असं पोलिसांनी नागरिकांना सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.