युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

JNPA port container issue: नवी मुंबईच्या जेएनपीए बंदरात केळी, द्राक्षे, डाळिंब आणि कांद्याचे सुमारे १,२०० कंटेनर गेल्या १३ दिवसांपासून अडकून पडले आहेत. निर्यात थांबल्यामुळे निर्यातदारांना नुकसान झाले आहे.
JNPA port container issue

JNPA port container issue

ESakal

Updated on

मुंबई : १३ दिवसांनंतरही जेएनपीए बंदरात केळी, द्राक्षे, डाळिंब आणि कांद्याचे १,२०० कंटेनर अडकून पडले आहेत. निर्यातीत व्यत्ययामुळे निर्यातदारांना १०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाले आहे. ज्यामध्ये जेएनपीएला मिळणारी रॉयल्टी देखील समाविष्ट आहे. शिपिंग कंपन्या नियंत्रणात नसल्याने त्यांनी युद्ध परिस्थितीचा फायदा घेत निर्यात केलेल्या मालाच्या प्रत्येक कंटेनरसाठी $800 ते $8,000 पर्यंत शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. JNPA कडून आखाती देशांमध्ये होणारी निर्यात 13 दिवसांपासून थांबवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com