नवी मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 February 2020

एकविसाव्या शतकातील शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईची हवा बुधवारी (ता. १९) देशात सर्वाधिक प्रदूषित होती. नवी मुंबईत बुधवारी दुपारी प्रत्येक घनमीटर हवेत ३८४ मायक्रोगॅम तरंगते धूलिकण (पीएम २.५) होते. नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाने दिवसभरात १७ सिगारेट ओढल्याइतके प्रदूषणाचे प्रमाण आहे.

नवी मुंबई : एकविसाव्या शतकातील शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईची हवा बुधवारी (ता. १९) देशात सर्वाधिक प्रदूषित होती. नवी मुंबईत बुधवारी दुपारी प्रत्येक घनमीटर हवेत ३८४ मायक्रोगॅम तरंगते धूलिकण (पीएम २.५) होते. नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाने दिवसभरात १७ सिगारेट ओढल्याइतके प्रदूषणाचे प्रमाण आहे. मुंबईसह उपनगरातही प्रदूषणाची पातळीही धोकादायक पातळीवर होती. त्यामुळे नागरिकांनी सूर्योदयापूर्वी घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

ही बातमी वाचली का? राज्यसभेसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'; वाचा कोण-कोण आहे शर्यतीत...

भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या ‘सफर’ उपक्रमांतर्गत प्रदूषणाची पातळी नोंदवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरील वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि रायगड जिल्ह्यातील उद्योगांतून होणारे प्रदूषण वाहत नवी मुंबईकडे येते. त्यातच वाऱ्याचा वेग मंदावल्याने हवेतील प्रदूषके वाहून जात नाहीत. त्यामुळे नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. दिल्लीत बुधवारी प्रदूषणाची पातळी प्रत्येक घनमीटर हवेत २९७ मायक्रोग्रॅम इतकी कमी होती. दिल्लीतील चांदणी चौकात तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण ४२२ मायक्रोग्रॅम होते. परंतु, हा परिणाम फक्त पाच ते सहा किलोमीटर परिसरापुरता होता. नवी मुंबईतील धूलिकणांचे प्रमाण ३८४ होते. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात सकाळी प्रमाण ३४८ मायक्रोग्रॅम होते. दुपारनंतर प्रदूषणाची पातळी कमी झाली.

ही बातमी वाचली का? महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना 'मोठा' दिलासा

  • तज्ज्ञांचा सल्ला
  • - सूर्योदय, सूर्यास्तानंतर घराबाहेर पडू नका.
  • - घराची दारे-खिडक्‍या बंद ठेवा. 
  • - मेणबत्ती, लाकूड, इतर कोणतीही वस्तू जाळू नका. 
  • - व्हॅक्‍युम क्‍लीनरने घर साफ करू नका.
  • - शारीरिक परिश्रमाची कामे करू नका.

प्रत्येक घनमीटर हवेतील तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण (मायक्रोग्रॅम)
ठिकाण                 बुधवार    गुरुवार
नवी मुंबई                ३८५    ३८४ 
मुंबई                      २६९    २६३
भांडुप                    १३०    १४५
कुलाबा                   २३७    २४१
मालाड                   ३०५    २९५
माझगाव                ३०६    २९३
वरळी                     ३१४    ३१९
बोरिवली                २२४    २६१
बीकेसी                  ३१६    ३०६
चेंबूर                      २२९    २००
अंधेरी                    २५३    २३१

ही बातमी वाचली का? अंबा नदीतील मासे नको रे बाबा!

हवेचा दर्जा 
० ते ५० मायक्रोग्रॅम : उत्तम  
५० ते १०० मायक्रोग्रॅम : चांगला 
१०० ते २०० मायक्रोग्रॅम : ठीक 
२०० ते ३०० मायक्रोग्रॅम : खराब
३०० ते ४०० मायक्रोग्रॅम : अतिप्रदूषित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai is the most polluted city in the country!