नवी मुंबईतल्या १० खासगी रुग्णालयांना पालिकेची नोटीस, वाचा सविस्तर

पूजा विचारे
Thursday, 13 August 2020

नवी मुंबई पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त (NMMC)यांनी दहा खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंबईः सध्या राज्यात कोरोनाचं सावट आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी प्रशासनानं प्रयत्न करताना दिसताहेत. राज्य सरकारनं कोरोनाच्या उपचारासाठी पालिकेसह खासगी रुग्णालयासाठी खास कार्यप्रणाली आखली आहे. चाचणी, रुग्णालयातील उपचार याची रक्कम राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आली असतानाही आतापर्यंत खासगी रुग्णालयाकडून अव्वाच्या सव्वा बिलं आकारल्या घटना समोर आल्या आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिकेनं अनेक रुग्णालयानं नोटीस देखील बजावल्या. नोटीस बजावूनही न ऐकणाऱ्या रुग्णालयांवर पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेनं अशा रुग्णालयाची नोंदणी देखील रद्द केली आहे. त्यातच आता नवी मुंबई पालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त (NMMC)यांनी दहा खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये रुग्णांना देण्यात येणाऱ्या बिला संदर्भात स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पालिकेनं खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या अतिरीक्त तक्रारींच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली होती. या नोटीसवर रुग्णालयांना ७२ तासांमध्ये उत्तर पालिकेला द्यायचं आहे.

अधिक वाचाः आशिष शेलार कोणाला म्हणाले, हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?

रुग्णांकडून उपचारासाठी अधिकची रक्कम आकारल्याच्या तक्रारी आल्या नंतर पालिकेनं समिती स्थापन केली. एनएमएमसीने कोरोनाबाधित रूग्णांना त्यांच्या तक्रारी moh@nmmconline.com यावर ईमेल करण्यासाठी, कार्यालयीन वेळेत 022-27567261 वर पालिकेशी संपर्क साधावा, असं आवाहन केलं होतं. तक्रारदार कार्यालयात येऊनही तक्रार दाखल करु शकतात. 

हेही वाचाः  आजोबांनी नातवाला फटकारल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, तो त्यांच्या...

नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या १९,४४० झाली आहे. शहरात मंगळवारी ४०७ नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होताना दिसतेय. तसंच शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत चालली आहे. शहरात मंगळवारी ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४८६ झाली आहे. आतापर्यत तब्बल १५,४८५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर ३,४६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४०,८४२ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहे. कोरोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होताहेत.

Navi Mumbai Municipal Commissioner issued notice 10 private hospitals overcharged


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipal Commissioner issued notice 10 private hospitals overcharged