नवी मुंबईतील घोटाळ्यांवर कारवाई कधी होणार ?मंदा म्हात्रें यांचा सवाल | Manda Mhatre | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manda Mhatre

नवी मुंबईतील घोटाळ्यांवर कारवाई कधी होणार ?मंदा म्हात्रें यांचा सवाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बेलापूर विभाग कार्यालय (Belapur office) आणि कोपरखैरणे उपकर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने (ACB Raid) रंगेहात पकडल्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचार (Navi Mumbai municipal corruption) ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या हाताला लवकरच बडे मासे लागण्याची शक्यता ‘सकाळ’ने (sakal) व्यक्त केली आहे. परंतु त्यानंतरही महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijit bangar) याआधी झालेल्या घोटाळ्यांची कारवाई का करीत नाही, असा प्रश्न बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda mhatre) यांनी उपस्थित केला आहे. म्हात्रे यांनी बांगर यांना दुसऱ्यांदा स्मरणपत्रही पाठवले आहे.

हेही वाचा: नवी मुंबई महापालिकेने वाढवल्या कोविड चाचण्या

महापालिकेच्या आस्थापनेत वारंवार भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. बेलापूर विभाग कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना पकडण्याची घटना ताजी असतानाच आता कोपरखैरणेतील उपकार विभागातील कर्मचाऱ्यालाही लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. पहिल्या कारवाईला अवघे दहा दिवसही उलटत नाही तोच कर्मचाऱ्यांची सुरू असलेली हप्तेखोरी थांबलेली नाही. या दोन ताज्या घटनांमुळे हप्तखोरीवर शिक्कामोर्तब झाला आहे. परंतु या घटनांआधी मंदा म्हात्रे यांनी उद्यान विभागात झालेल्या ८ कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रे महापालिका प्रशासनाकडे सादर केली आहेत.

तसेच ‘सकाळ’ने उघड केलेला कंत्राटी कामगारांच्या भरती घोटाळ्याबाबतही चौकशीची मागणी म्हात्रे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. वडिलोपार्जित जागेवर घर बांधण्यासाठी महापालिका परवानगी देत नाही. परंतु अधिकाऱ्यामार्फत पैसे दिल्यावर या परवानग्या दिल्या जात आहेत. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मंदा म्हात्रे यांनी विविध निवेदनांद्वारे केली आहे. परंतु त्यावर प्रशासनातर्फे काहीच कार्यवाही न झाल्याने म्हात्रे यांनी आयुक्तांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेला अनेक निवेदने दिल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

"महापालिका आस्थापनेत भ्रष्ट अधिकारी कार्यरत आहेत, याचा उलगडा होणे कठीण आहे. संपूर्ण राज्यात नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक असताना कामांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. वारंवार मागणी केलेल्या भ्रष्टाचाराची पुन्हा उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई केल्यास यापुढे होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसू शकेल."
- मंदा म्हात्रे, भाजप आमदार, बेलापूर

loading image
go to top