वातावरण तापतंय ! बालेकिल्ल्यातच गणेश नाईकांबाबत जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

वातावरण तापतंय ! बालेकिल्ल्यातच गणेश नाईकांबाबत जितेंद्र आव्हाड यांचं मोठं वक्तव्य

वाशी, नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये दबदबा असणाऱ्या गणेश नाईक आणि परिवाराला विविध पदे दिली. मुलांसारखे, भावासारखे प्रेम दिले. मात्र एवढे सारे देऊनही गणेश नाईक यांनी शरद पवारांबरोबर दगा फटका दिला, हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कधीही विसरणार नाही. आगामी पालिका निवडणुकीत शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गणेश नाईक यांची एकाधिकारशाही मोडीत काढा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. 

कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी, कार्यकर्त्यांनी गाफिल न राहता एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तर आघाडीमध्ये प्रामाणिकपणा हवा तरच नवी मुंबई काबीज करता येईल, अशी सूचना महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली. या निमित्ताने महिलासाठी आयोजित विविध स्पर्धा आणि वाद्यवृदांचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्पर्धेतील विजेत्यांना फ्रिज, सोन्याची नथ, पैठणी इतर पारितोषिके देऊन अरविंद माने आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका माने यांनी सन्मानित केले. 

ऐरोली, सेक्‍टर 16 येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदवीधर मतदार संघाचे नवी मुंबई जिल्हाअध्यक्ष अरविंद माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन, प्रभाग 15 मध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाचा शुभारंभ आणि हळदीकूंक कार्यक्रमांप्रसगी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, कार्यअध्यक्ष जी. एस. पाटील, राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार संघटना नवी मुंबई अध्यक्ष किशोर आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

navi mumbai municipal corporation election jeetendra awhad vs ganesh naik tussle before election

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com