

Navi Mumbai municipal corporation
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीमंत उमेदवारांच्या यादीत काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला आहे. माजी नगरसेवक, काँग्रेसचे उमेदवार संतोष शेट्टी यांनी तब्बल १०० कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. ते आणि त्यांच्या पत्नी अशी दोघांची मिळून ही मालमत्ता जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या श्रीमंत उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण २६६ उमेदवार हे कोट्यधीश आहेत.