Navi Mumbai: महिनाभराची झुंज अपयशी, कचरा गाडीच्या धडकेत तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; महापौरांकडून शोक व्यक्त

Navi Mumbai Accident: नवी मुंबई महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत जखमी तरूणीचा महिनाभरानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नवी मुंबईच्या महापौरांनी शोक व्यक्त केला आहे.
NMMC garbage truck Accident

NMMC garbage truck Accident

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या १८ वर्षीय श्रेया फिरके हिचे गुरुवारी (ता. २३) सायंकाळी उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या जवळपास महिनाभरापासून ती खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. शुक्रवारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com