नवी मुंबई महापालिकेत बदल्यांबाबत नियमावली नाही; माहिती अधिकार अर्जावर दिले उत्तर 

महापालिका नवी मुंबई.jpeg
महापालिका नवी मुंबई.jpeg

तुर्भे : नवी मुंबई महापालिकेत कर्मचारी-अधिकारी वर्ग यांच्या बदल्यांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्याचे समोर आले आहे. पालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत माहिती अधिकारी कार्यकर्त्या गौतम गायकवाड यांनी माहिती मागविली होती. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे बदल्यांविषयीचे धोरण महापालिकेने निश्‍चित करावे, अशी मागणी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे गायकवाड यांनी केली आहे. 


गायकवाड यांनी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून महानगरपालिका कर्मचारी-अधिकारी यांच्या बदल्यांविषयीच्या अस्तित्वात असणाऱ्या नियमावली व धोरण विषयीची माहिती मागितली होती. त्यावर संबंधित जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी महेंद्र सप्रे यांनी कर्मचारी-अधिकारी यांच्या बदल्यांसंदर्भात कोणत्याही प्रकारचे नवी मुंबई महानगरपालिकेचे धोरण नाही, असे लेखी उत्तर दिले होते. यावर माहिती अधिकार कार्यकर्ते गायकवाड यांनी प्रथम अपिलीय माहिती अधिकारी तथा महापालिकेचे उपायुक्त (प्रशासन) दादासाहेब चाबुकस्वार यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला. या अपिलावर नुकतीच सुनावणी झाली आणि त्यात उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनीही जनमाहिती अधिकारी यांनी दिलेल्या कर्मचारी-अधिकारी यांच्या बदल्यांसंदर्भात नियमावली नसल्याचे उत्तर योग्य आहे, असे स्पष्ट करत बदल्यांसंदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडे कोणत्याही प्रकारची नियमावली व धोरण नसल्याचे सुनावणी आदेशात म्हटले आहे. 

कोट... 
नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबतीत कोणत्याही प्रकारचे नियम नाहीत हे स्पष्ट झाले आहे. यामुळेच पालिकेच्या विविध प्रकारच्या विभागात व कार्यालयात काही कर्मचारी, अधिकारी हे कित्येक वर्षे ठाण मांडून आपली जहांगीरी असल्यासारखे बसले आहेत. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर बदल्यांविषयी नियमावली तयार करावी. 
- गौतम गायकवाड, माहिती अधिकार कार्यकर्ते. 

 

Navi Mumbai Municipal Corporation has no rules regarding transfers

(संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com