

Navi Mumbai Municipal Schemes
esakal
नवी मुंबई: पालिकेच्या महासभेत महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अनाथ व विधवा महिलांसाठीच्या विविध योजनांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी सकारात्मक चर्चा घडवून आणली. नगरसेवकांच्या सूचनांची तत्परतेने दखल घेत, येत्या ऑगस्टपासून महापालिकेच्या सर्व लोककल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या जातील, अशी घोषणा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली. केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता महिला व तरुणांना थेट नोकरी मिळवून देण्यापर्यंत महापालिका प्रयत्न करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.