
नवी मुंबई: ‘स्वच्छ भारत मिशन’मध्ये देशात अग्रेसर असणाऱ्या नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदरतेत जागरूक नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा सर्वांत महत्त्वाचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महापालिका, सकाळ आणि एलसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. पामबीच मार्गावर रविवारी (ता. २२) होणाऱ्या या मॅरेथॉनला नवी मुंबई महापालिका मुख्यालयापासून पहाटे ५.३० वाजता सुरुवात होणार आहे.