महापालिकेच्या ताफ्यात नवीन स्विपिंग मशीन येणार!

नवी मुंबई महापालिकेच्या ताफ्यात नवीन स्विपिंग मशीन येणार!
नवी मुंबई महापालिकेच्या ताफ्यात नवीन स्विपिंग मशीन येणार!

नवी मुंबई : जेएनएनयूअंतर्गत महापालिकेने खरेदी केलेल्या स्विपिंग मशीन (तांत्रिक झाडू) जुन्या झाल्यामुळे लवकरच महापालिकेच्या ताफ्यात नवीन स्विपिंग मशीन दाखल होणार आहेत. परदेशी बनावटीच्या अत्याधुनिक पद्धतीच्या या स्विपिंग मशीन कंत्राटदारामार्फत उपलब्ध केल्या जाणार आहेत. शुक्रवारी (ता. १५) एका कंपनीने नमुना दाखवण्यासाठी अत्याधुनिक स्विपिंग मशीन महापालिका मुख्यालयाच्या आवारात आणली होती. 

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनंतर्गत महापालिकेने दहा वर्षांपूर्वी सुमारे सात कोटी रुपये खर्च करून आठ मशीन खरेदी केल्या होत्या. या मशीनद्वारे पामबीच रस्ता, ठाणे-बेलापूर व नेरूळ-उरण जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गावरील दैनंदिन स्वच्छता करण्याचे काम केले जात होते. या यांत्रिक पद्धतीच्या झाडू कामासाठी महापालिकेला दर महिन्याला ५० ते ६० लाख रुपये खर्च येत आहे; परंतु या मशीन सध्या जुन्या व कालबाह्य होत आल्यामुळे रस्त्यावरील धूळ, खाडी तसेच इतर कचरा गोळा करण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे या मशीनऐवजी नवीन मशीन खरेदी करण्याचे प्रशासनाच्या विचाराधिन आहे. त्यासाठी परदेशी बनावटीची अत्याधुनिक यांत्रिक झाडू खरेदी केली जाणार आहे. बाजारात आलेली ही नवीन मशीनद्वारे पूर्वीपेक्षा पाच ते आठ प्रतिकिलो मीटर वेगाने साफसफाई होणार आहे. त्यामुळे पालिकेला अधिक चांगली व वेगात स्वच्छता करणे सहज सोपे होणार आहे. या मशीनला दोन्ही बाजूला यांत्रिक झाडू असल्यामुळे एकाच वेळी संपूर्ण रस्ता स्वच्छ होऊ शकणार आहे. शुक्रवारी महापालिका आयुक्त मिसाळ काही कामानिमित्ताने बाहेर गेल्यामुळे ही नमूना चाचणी होऊ शकली नाही.

पूर्वीचा वाद
सुरुवातीला या मशीन खरेदीवर विरोधकांनी टीका केल्यामुळे महापालिकेची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती; परंतु महापालिकेला एका दुसऱ्या विकास कामासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळत असल्यामुळे या स्विपिंग मशीन खरेदीची अट केंद्राने घातली असल्याची बाब विरोधकांना सांगून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी वेळ मारून नेली होती. 

पूर्वी खरेदी केलेल्या स्विपिंग मशीन जुन्या झाल्यामुळे आता नवीन मशीन खरेदी करण्याचे महापालिकेच्या विचाराधिन आहे. बाजारात अत्याधुनिक बनावटीच्या मशीन उपलब्ध आहेत. त्यापैकी नमुना तपासून निर्णय घेतला जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com