esakal | नवी मुंबई : विकासकांकडून वृक्षतोड परवान्याच्या अटींचा भंग | Navi Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Cutting

नवी मुंबई : विकासकांकडून वृक्षतोड परवान्याच्या अटींचा भंग

sakal_logo
By
सकाळ वृत्तेसवा

सानपाडा : नवी मुंबई (navi mumbai) शहरात विनापरवाना वृक्षतोड (illegal tree cutting) कारवाईत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. विनापरवानगी वृक्षतोड केल्याप्रकरणी ऐरोलीतील एका व्यक्तीवर रबाळे पोलिस ठाण्यात (rabale police station) २९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील बड्या विकासकांनी वृक्षतोड परवान्याच्या अटींचा भंग करूनही त्यांच्यावर पालिका उद्यान विभागामार्फत अद्याप कारवाई केली जात नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : ऑक्टोबर हिटचा तडाखा; बदलत्‍या हवामानाचा परिणाम

नवी मुंबई शहरातील पर्यावरणाचा समतोल कायम राखावा, यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कडक धोरण जारी केले आहे. शहरात विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता थेट गुन्हा नोंदवण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. असे असूनही कोपरखैरणे विभागात काही खासगी विकसकांमार्फत विनापरवाना वृक्षतोड करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी पालिका अभियंत्यांच्या नावे अटीशर्तीच्या अधीन राहून वृक्षतोड/स्थलांतर करण्याच्या परवानग्या देण्यात आल्या होत्या. मात्र, या परवानगीचा दुरुपयोग केला जात असून, कापलेल्या झाडांच्या बदल्यात कुठलीही नवीन झाडे लावली जात नाहीत.

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

स्थलांतर केलेल्या झाडांचीही निगा राखली जात नाही. त्यामुळे अशा परवानगीचे सर्रासपणे उल्लंघन करून एक प्रकारे वृक्षांची कत्तलच केली जात आहे, असा ठपका काही जागरूक नागरिक ठेवत आहेत. याबाबत नागरिकांनी तक्रारी करून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी व्यावसायिक आणि अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई केली जात नाही. दुसरीकडे मात्र ऐरोलीत एका व्यक्तीवर विनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच महापालिकेत एकच कायदा असताना उद्यान विभागाकडून कारवाईत दुजाभाव केला जात आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

loading image
go to top