
Navi Mumbai municipal corporation
ESakal
वाशी : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोपरखैरणे व वाशी येथे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई केली. वाशी विभागाअंतर्गत जुहू गाव येथे रंजना मधुकर भोईर (घर क्र. ३३८) यांच्या मालकीच्या अनधिकृत बांधकामास तसेच कोपरखैरणे विभागातील कोपरखैरणे सेक्टर १३ मधील भूखंड क्र. १० वरील राजपाल हॉस्पिटल व आकाश नंदलाल राजपाल यांच्या अनधिकृत बांधकामावर ही कारवाई करण्यात आली.