
Navi Mumbai: भांडणाचा राग मनात धरून अशोककुमार आनंद शेखर (वय ३६) याने किशोर तुकाराम चेवले (४८) यांना मारहाण केली. यात किशोर चेवले यांचा मृत्यू झाला. ही घटना सीबीडी सेक्टर ११ मधील मधुशाला देशीबारसमोर घडली होती. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी अशोककुमार याला अटक केली.