नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आज मोर्चेबांधणी

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आज मोर्चेबांधणी
नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची आज मोर्चेबांधणी

नवी मुंबई : माजी आमदार संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता. ८) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मुख्य पक्षप्रतोद जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आणि नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत. नेरूळच्या तेरणा महाविद्यालयाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

नाईकांसोबत राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक भाजपमध्ये जाणार अशी वल्गना नाईकांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती. मात्र, ५२ पैकी १५ नगरसेवक सध्या भाजपमध्ये न जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत. नगरसेवकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नाईकांच्या मर्जीतील जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांना पायउतार करून नगरसेवक अशोक गावडे यांची नवीन जिल्हाध्यक्षपदी निवड करून राष्ट्रवादीने नाईकांना पहिला धक्का दिला आहे. आता बैठक घेऊन त्यापाठोपाठ भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची वाट अडवण्याचे काम केले जाणार आहे. या बैठकीत नवी मुंबईतील पक्षबांधणी व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भर दिला जाणार आहे. 

नगरसेवकांची वाट अडवण्याचा प्रयत्न
गेल्या १५ वर्षांनंतर पहिल्यांदाच गणेश नाईकांशिवाय ही बैठक होणार असल्याने या बैठकीकडे राजकीय वर्तुळात सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीत राहण्याच्या भूमिकेवर आत्तापर्यंत १५ नगरसेवक ठाम आहेत. हा आकडा वाढवण्याचा राष्ट्रवादीचा या बैठकीच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com