पनवेलमधील टेकड्यांवर वणवा; हिरवेगार डोंगर झाले काळेकुट्ट | Navi mumbai news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

conflagration

पनवेलमधील टेकड्यांवर वणवा; हिरवेगार डोंगर झाले काळेकुट्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवीन पनवेल : पनवेलपासून (Panvel) हाकेच्या अंतरावर असलेल्या पूर्व भागातील टेकड्या गेली दोन दिवस धुमसत आहेत. टेकड्यांवरील गवत, झाडे-झुडपांना आगी लागण्याचे (Fire in mountain) प्रमाण वाढत आहे. त्‍यामुळे महिनाभरापूर्वी हिरव्यागार दिसणाऱ्या टेकड्या काळ्याकुट्ट दिसू लागल्या आहेत. पनवेल तालुक्यातील डोंगरांवर अनेक सामाजिक संस्‍था, पर्यावरण प्रेमींकडून (environmentalist) झाडे लावली जातात. मात्र काही समाजकंटकांकडून जाणूनबुजून वणवे लावले जात असल्‍याने वनसंपदेचा ऱ्हास होत आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : NMMT बसचालक, वाहकाला मारहाण; किरकोळ कारणावरून वाद

पनवेल परिसरातील डोंगर व टेकड्यांना आगी लागण्याचे सत्र सुरू असतानाच, पनवेलच्या पूर्वेकडील वलप, वळवली, वाकडी या ठिकाणच्या टेकड्याही दोन दिवसांपासून धुमसत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात वन विभागाला अपयश येत आहे. यात डोंगरावरील वनसंपदा खाक होत असल्याने वन्यजीवांनाही धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून राज्य सरकारनेही वृक्षसंवर्धन व संरक्षणावर भर दिल्यामुळे पावसाळ्यात अनेक सेवाभावी संस्था, मंडळे, सामाजिक कार्यकर्त्‍यांकडून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. मात्र काही समाजकंटकांद्वारे टेकड्यांना आगी लावल्या जात असल्‍याने झाडे खाक होतात. खारघर टेकडीप्रमाणे या ही ठिकाणी आग लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.

loading image
go to top