वानखेडे प्रकरणी पुढील आठवड्यापर्यंत 'नो ट्विट्स-नो कमेंट्स'; नवाब मलिकांचं कोर्टाला वचन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab Malik

वानखेडे प्रकरणी पुढील आठवड्यापर्यंत 'नो ट्विट्स-नो कमेंट्स': नवाब मलिक

मुंबई: एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक प्रकारचे आरोप केले आहेत. त्यातील मुख्य आरोप म्हणजे समीर वानखेडे यांनी आपला धर्म लपवून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असल्याचा आरोप होय. यासंदर्भात नवाब मलिक हे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट्स करत आहेत. नवनवी माहिती उजेडात आणून समीर वानखेडे हे कसे मुस्लिमच आहेत, याची माहिती करुन देत खुलासे करत आहेत. त्यांच्या या ट्विट्सविरोधात मानहानी खटल्याचा आधार घेत समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भातच आता न्यायालयाने नवाब मलिक यांना पुढील आठवड्यापर्यंत या प्रकरणी ट्विट न करण्याचे वचन घेतले आहे.

हेही वाचा: 'समीर वानखेडेंनी दफनविधीवेळी आईचा मुस्लिम धर्म दाखवला'

मानहानीच्या खटल्यात नवाब मलिक यांनी पुढील आठवड्यापर्यंत वानखेडेविरोधात ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्य न करण्याचे वचन दिले आहे. न्यायमूर्ती एसजे काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

हेही वाचा: एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

काय होतं आजचं नवं ट्विट?

"धर्म बदलण्यासाठी प्रतिज्ञापत्र उपयोगी नसते. त्यासाठी गॅझेट करावे लागते. त्यांनी हे काही केले नाही. संपूर्ण कुटुंबाने आपली दुहेरी ओळख ठेवली. वडील दाऊद, ज्ञानदेव अशी दुहेरी ओळख. बहिणीनीनेही तेच केले. समीरनेही दुहेरी ओळख ठेवली. समीरने बोगस दाखल्यांचा आधारे मागासवर्गीय प्रमाणपत्र घेतले आणि नोकरी मिळवली" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते नवाब मलिक यांनी आज केला आहे. "त्यांच्या आईचे निधन झाल्यानंतर ओशिवरा दफनभूमीत दफनविधी करण्यात आला, तिथे आईच्या धर्माचा उल्लेख १४ एप्रिल २०१५ रोजी मुस्लिम म्हणून केला. पण दुसर्‍या दिवशी महापालिकेत मृत्यूची नोंद करताना हिंदू अशी केली. आईच्या मृत्यूनंतरही त्याने आईबाबत असा बोगसपणा केला" अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

loading image
go to top