नवी मुंबई : पाण्याअभावी एमआयडीसीतील नागरिकांची गैरसोय

water scarcity
water scarcitysakal media

तुर्भे : तुर्भे एमआयडीसीतील (turbhe midc) रहिवासी भागात पाण्याचा पुरवठा (water supply) योग्य रीतीने होत नसल्याने नागरिकांना आठवड्यातून किमान दोन वेळा तरी टँकरच्या पाण्यावर (tanker water) तहान भागवावी लागते. सार्वजनिक शौचालयातही (public toilets) पाणी नसल्‍याने या भागातील रहिवाशांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर जावे लागते. त्यामुळे नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी गैरसोय (civic problems) होत आहे. त्यामुळे या भागात नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

water scarcity
पनवेल : बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाईचा पोलिसांचा दिखावा

तुर्भे एमआयडीसी परिसरात बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र दर आठवड्याच्या शुक्रवारी शटडाऊन असल्याने गुरुवारी रात्रीपासूनच पाणी पुरवठा बंद केला जातो. शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्‍याने अनेकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाण्याचे टँकर पाठवले जातात. टँकर येताच नागरिकांची पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. दिवाळीतही शट डाऊन घेण्यात आल्‍याने ऐन उत्‍सवात रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले.

पाण्यासाठी आजूबाजूच्या कंपनीमध्ये नागरिक धाव घेतात, काही कंपन्यांमधून पाणी दिले जाते तर काही कंपन्यांनाच स्‍वतःसाठी टँकर मागवावे लागतात. स्वतःच्या मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई शहरात पाण्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहरातील काही भागांमध्ये एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो, मात्र ऐन वेळी तांत्रिक बिघाड, जलवाहिनी फुटणे त्यामुळे पाणीपुरवठा खंडित होतो. परिणामी नागरिकांची तारांबळ उडते. आजही नवी मुंबई शहरातील बऱ्याच भागात एमआयडीसी पाणीपुरवठा करीत असलेल्या भागात पाणीबाणी समस्या उद्‌भवत असून टँकरद्वारे पाणी पुरवले जाते.

"तुर्भे इंदिरानगर व बागडेमधील रहिवासी वस्‍तीत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. मात्र बऱ्याच वेळा कमी दाबाने पाणीपुरवठा, जलवाहिनी फुटणे, तांत्रिक बिघाड अशी कामे सुरू असतात. त्यामुळे दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पाण्याची समस्या निर्माण होत असून नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागात सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा."
- महेश कोटीवाले, शिवसेना विभाग प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com