फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही

फक्त 'हे' कानातले घाला मग मुलींनो तुमची छेड काढण्यास कुणीही धजावणार नाही

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारच्या घटना संपूर्ण देशभरात वाढत चालल्या आहेत. त्यामुळे देशभरातल्या महिलांमद्धे भीतीच वातावरण पसरलं आहे. मात्र अशा घटना टाळण्यासाठी आत्याधुनिक तंत्रज्ञान एका तरुणाने बनवलंय. महिलांची छेड काढणाऱ्या नराधमांना आता महिला चोख प्रत्युत्तर देऊ शकणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून थेट महिलांच्या कानातल्यांमधून म्हणजेच झुमक्यातून चक्क गोळ्या सुटणार आहेत. त्यामुळे महिला आपल्या झुमक्याद्वारे स्वसंरक्षण करू शकणार आहेत. 

अनेकदा भररस्त्यात, नाक्यावर किंवा एखाद्य ठिकाणी महिलांची छेड काढण्यात येते. यात महिलांना पोलिसांकडून तातडीनं मदत मिळू शकत नाही, कुणाकडे मदत मागणे देखील शक्य होत नाही. मात्र आता महिलांना स्वत:च्या संरक्षणासाठी फक्त स्मार्ट झुमके खरेदी करण्याची गरज असणार आहे. महिलांच्या झुमक्यातून थेट मिरची गोळ्या बाहेर पडणार आहे. 

असे आहेत स्मार्ट झुमके:

खरतरं महिलांवर होणारे अत्याचार कमी करण्यासाठी आणि महिला स्वसंरक्षणासाठी हे यंत्र बनवण्यात आलं आहे. पण त्याला सुंदर अशा झुमक्यांचं रूप देण्यात आलं आहे. या झुमक्यांमध्ये तुम्हाला त्रास देणाऱ्यावर थेट गोळ्या सुटल्याप्रमाणे मिरची बुलेट्स सुटायला सुरुवात होईल. मिरची गोळ्या म्हणजे या गोळ्यांमधून थेट मिरचीची पूड बाहेर पडणार आहे. या यंत्राच्या मध्यमतून पोलिसांच्या १०० आणि ११२ या दोन्ही नंबरला तातडीनं अलर्ट पोहोचणार आहे.

या झुमक्यांमध्ये दोन स्विच आहेत यातील एकामुळे मिरची गन ट्रिगर होईल तर दुसऱ्या स्विचमुळे थेट पोलिसांना माहिती मिळणार आहे. हे झुमके ब्लु-टुथलाही जोडता येणार आहे. विशेष म्हणजे हे झुमके हातात घेऊन याचा बंदुकीसारखाही वापर करता येऊ शकतो. या झुमक्यांना एकदा चार्ज केलं तर त्यांची बॅटरी तब्बल १ आठवडा चालणार आहे. 

झुमक्यांची किंमत काय ? 

या अनोख्या कानातल्यांचं वजन अतिशय कमी आहे. यांचं वजन 45 ग्रॅंम इतकं आहे. तर त्यांची लांबी 3 इंच इतकी आहे. हे कानातले ब्लु टूथने कनेक्टेड असल्याने १०० आणि ११२  या क्रमांकावर अलर्ट देखील जातो. या हायटेक मिर्ची झुमक्यांची किंमत फक्त ४५० रुपये आहे.

वाराणसीच्या अशोका इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाच्या प्रभारी असलेल्या श्याम चौरसिया यांनी हे यंत्र बनवलं आहे. त्यामुळे आता हे झुमके खरेदी करण्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.  

smart zumka with chilly powder will help girls and women in emergency situation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com