नवी मुंबईत विनाकारण खाटांची अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेणार; अशाप्रकारची राज्यातील पहिलीच मोहिम

नवी मुंबईत विनाकारण खाटांची अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेणार; अशाप्रकारची राज्यातील पहिलीच मोहिम


नवी मुंबई : विनाकारण आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा अडवणूक करणाऱ्यांचा शोध घेण्याचा महत्त्वाचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांना खासगी रुग्णालये तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारे शोध घेणारी नवी मुंबई ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे. 

नवी मुंबई महापालिकेतर्फे कोव्हिड रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या केंद्र आणि प्रयोगशाळेचे 10 सप्टेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी ठाकरे यांनी बोलताना विनाकारण खाटा अडवणाऱ्या रुग्णांबाबत प्रश्न उपस्थित केला. याआधी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील अशा विनाकारण खाटा अडवणाऱ्या लोकांचा उल्लेख केला होता. राज्यातील बहुतांश शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये काही धनिक रुग्णालयांमध्ये आवश्यकता नसतानाही आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटा अडवून ठेवत आहेत. अशा व्यक्तींमुळे अत्यावस्त रुग्णांना योग्यवेळी खाट उपलब्ध होत नाही. काही जणांना वेळेवर आयसीयू न मिळाल्यामुळे जीव देखील गमवावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. याची दखल घेत बांगर यांनी अशा रुग्णांना सोधण्याची मोहीम आखली आहे.

शहरातील खासगी रुग्णालयांना सरकारच्या नियमांनुसार 80 टक्के खाटा सरकारी, तर 20 टक्के खाटा खासगी रुग्णालयांना त्यांच्या रुग्णांसाठी वापरू शकतात. ज्या रुग्णालयांमध्ये हे प्रमाण बिघडलेले असते. अशा संशयित रुग्णांलयांमध्ये अचानक तज्ज्ञांचे पथक भेट देऊन आयसीयू आणि ऑक्सिजनच्या खाटांवरील रुग्णांना तपासणार आहे. एखाद्या रुग्णाला दिल्या जाणाऱ्या उपचाराची तपासणी आणि त्याला होत असणाऱ्या त्रास तपासून त्याला खरंच या उपचारांची गरज आहे की नाही हे उघड होणार आहे. अशा पथकांमुळे रुग्णालयांमध्ये होत असणारी विनाकारण खाटांची अडवणूक उघडकीस येणार आहे. 

रुग्णालयांमधील आयसीयूतील खाटांची विनाकारण अडवणूक करणाऱ्यांना शोधता येऊ शकते. काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांना अचानक खासगी रुग्णालयांना भेटी देऊन आयसीयूतील रुग्णांना दिले जाणारे उपचाराची चौकशी करून उघड होईल. तशा प्रकारच्या सूचना पालिकेच्या पथकांना देण्यात येणार आहेत. 
- अभिजीत बांगर,
आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

खासगी रुग्णालयांतील आयसीयू खाटा भरल्या 
नवी मुंबई शहरात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि ठाणे जिल्ह्याच्या शेजारच्या जिल्ह्यातील नागरीक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. त्यामुळे या नागरीकांच्या आडून जिल्ह्याबाहेरील रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती झाले आहेत. बहुतांश रुग्ण आयसीयूमध्ये असल्याने खासगी रुग्णालयांमधील आयसीयू फुले झाले आहेत. महापालिकेने 21 खासगी रुग्णालयांना महापालिकेतर्फे कोव्हीड अधिग्रहीत रुग्णालय म्हणून घोषीत करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये असणारे आयसीयू भरून गेले आहेत. एकाही खासगी रुग्णालयात आयसीयूच्या खाटा उपलब्ध राहीलेल्या नाहीत.  

नवी मुंबईतील खाटांची आकडेवारी ग्राफीक्सकरीता
एकूण आयसीयू खाटा
- 336
भरलेल्या आयसीयू खाटा - 321 
उपलब्ध आयसीयू खाटा - 15

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com