'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

मुंबई : श्रीमंत आणि अतिउत्साही लोकं शो ऑफ करण्यासाठी काय करतील याचा काहीच नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडलाय. पंढरीनाथ फडके नावाच्या नेत्यानं थेट क्रिकेटच्या मैदानात घुसून हवेत गोळीबार केल्याची घटना घडलीये. इतकंच नाही तर फडके यांच्या समर्थकांनी यावेळी त्यांच्यावर नोटांचा वर्षावही केला. 

मोठी बातमी - लव्ह, टॅटू, धोका... आणि मग...

पनवेलच्या विहिंगर गावात सध्या रात्रकालीन क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी आपल्या एन्ट्रीचा शोऑफ करण्यासाठी शेकापचे नेते पंढरीनाथ फडके आपल्या समर्थकांसोबत कारनं थेट मैदानात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी डिजेवर 'बीएमडब्ल्यू घेऊन आला पंढरी शेठ फडके, विहिघरवाला बिनजोड छकडेवाला' हे गाणं मोठ्या आवाजात वाजवायला सुरुवात केली. मग काय या नेत्याला स्वतःला आवरताच आलं नाही.

पंढरीशेठनं आपल्या जवळची पिस्तुल काढून थेट हवेत गोळीबार करायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार बघून त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर नोटांचा पाऊस पाडला. एकूणच काय तर नेताजींनी मैदानात आपली चांगलीच हवा केली. मात्र, हे प्रकरण गांभीर्यानं घेत नवी मुंबईतील खारघर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

कोण आहेत पंढरीनाथ फडके: 

पंढरीनाथ फडके हे शेतकरी पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय. पंढरीनाथ फडके यांचा चांगलाच धाक तिथल्या लोकांवर आणि त्यांच्या समर्थकांवर आहे.

मोठी बातमी - म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत...

एकूणच काय तर हा प्रकार करून पंढरीशेठ यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय अशीच आता राजकीय परिघात चर्चा आहे. याप्रकरणात पंढरीनाथ फडके यांना  खारघर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेयं. 

navi mumbai pandharinath phadake enters cricket ground by shooting 4 rounds in air cops take action

टॅग्स :Navi MumbaiCricket