त्या नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांचे सर्च ऑपरेशन

File Photo
File Photo

नवी मुंबई : निजामुद्दीन येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तबलिग ए जमातच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या नवी मुंबईतील नागरिकांची शोधाशोध करण्यात सरकारी यंत्रणांची धावपळ उडाली आहे. उपविभागीय अधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या डॉक्‍टरांच्या मदतीने शहरात नवी मुंबई पोलिसांमार्फत सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

या कार्यक्रमात सहभागी झालेले २३ जण नवी मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून दिघा ते बेलापूर हा परिमंडळ- १ आणि खारघर ते पनवेल-उरण तालुका परिमंडळ- २ या भागांमध्ये पोलिसांनी त्या नागरिकांना शोधण्यासाठी बुधवारी रात्रीपासून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. घणसोली, ऐरोली, वाशी, तुर्भे नाका, शिरवणे, सीवूड्‌स आदी भागांत शोधमोहीम राबवली आहे. पनवेलमधून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीहून नवी मुंबई शहरात आलेल्या सर्वच नागरिकांचा शोध घेत आहोत. बुधवारी रात्रीपासून आतापर्यंत ३० लोकांचा ठाणठिकाणा सापडला आहे. त्यापैकी तबलिग-ए-जमातच्या मेळाव्यात सहभागी झालेले नवी मुंबईतील चार जण आढळून आल्याची माहिती नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातील १३९ जण सहभागी 
दिल्लीतील निझामुद्दीनमधील तबलिगी जमात या धार्मिक कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील १३९ जण सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्वांचा प्रशासनाकडून शोध सुरू असल्याचे कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी मुंब्रा परिसरात १४ बांगलादेशी व ८ मलेशियन या २२ परदेशी नागरिकांसह दोन आसामी नागरिकांना ठाणे महापालिका व पोलिसांनी होम क्वारंटाईन केले होते. त्यांचे कोरोना तपासणी अहवाल अद्याप आले नसल्याची माहिती मुंब्रा क्षेत्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. हेमांगी घोडे यांनी दिली.

मुंबईत सर्वच व्यक्ती सापडल्‍या
मुंबई : निजामुद्दीन येथे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तबलिग ए जमातच्या मेळाव्यात सहभागी झालेले सुमारे १५० व्‍यक्‍ती सापडले आहेत.  त्यातील १२ जण वांद्रे; तर २० लोक सांताक्रूज येथे थांबल्याचे सूत्रांनी सांगितले. तबलिग ए जमातच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या सांताक्रूज येथील बडी मस्जिद २०; तर वांद्रे येथील झरिना सोसायटी येथील १२ जणांना विलगीकरण करण्यात आले. वांद्रे येथील १२ जण इंडोनेशियामधून आले होते; तर बडी मस्जिदमधील नागरिक गुजरात, राजस्थानचे होते. ३० मार्चला डॉक्‍टरांची त्यांची तपासणी केली आणि त्यांना क्वारंटाईन केले; मात्र अजून तपासण्या करण्याची शक्‍यता आहे. याशिवाय इतर व्यक्तींची माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. 

Navi Mumbai police search operation for those citizens 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com