`या` पर्यटनस्थळांवर गेलात तर कायदेशीर कारवाईला तयार रहा..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

पावसाळा सुरू होताच पर्यटक खारघरमधील पांडवकडा धबधबा, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा जेल समोरील तलाव आणि सेक्टर 6 ड्रायव्हिंग रेंज लगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. हा आनंद घेत असताना अनेक पर्यटक पडून जखमी होण्याचे आणि बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या हे सर्व पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. 

मुंबई  : पावसाळा सुरू होताच पर्यटक खारघरमधील पांडवकडा धबधबा, फणसवाडी, चाफेवाडी, ओवे, तळोजा जेल समोरील तलाव आणि सेक्टर 6 ड्रायव्हिंग रेंज लगत असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. हा आनंद घेत असताना अनेक पर्यटक पडून जखमी होण्याचे आणि बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या हे सर्व पर्यटन क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.  या ठिकाणी विनापरवाना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिला आहे.

 महत्त्वाची बातमी ः   कोरोनाचा वाढता संसर्ग; ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता 'या' तालुक्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा...

 दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी सकाळी 8.30  वाजल्यापासून  शनिवारी दुपारी 2.30  वाजेपर्यंत वादळी वाºयासह, विजेच्या कडकडाटयाने  दमदार पाऊसाने हजेरी लावली. या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रात 183.48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर जुन महिला सुरु झाला तरी पाऊस पडला नसल्यामुळे सर्व जण चिंतेत होते. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवडयात  पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे उन्हाळयात उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सततधार सुरु असणाºया पाऊसामुळे कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाºया प्रवाशांचे देखील हाल झाले आहे. मुसळधार पाऊसामुळे पुर्णपणे नालेसफाई न झाल्यामुळे पाणी तुबंण्याचे प्रकार देखील घडले.

मोठी बातमी ः राजेश टोपेंनी दिली गोड बातमी, आता कोरोना रुग्णांना आपल्या नातेवाईकांना 'असं' भेटता येणार
  3 जूलै रोजी सकाळी 8.30   वाजल्यापासून  4 जुलै  पर्यत  दुपारी 2.30  वाजेपर्यंत 30  तासात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 168.2  मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये बेलापूर 178.9 मिमी, नेरूळ 136 मिमी, वाशी 194 मिमी, ऐरोली 183.48 मिमी अशाप्रकारे पावसाची नोंद झाली आहे. पाऊसांच्या दमदार हजेरी मुळे ठाणे बेलापुर मार्गासह, सायन पनवेल महामार्गवरील रस्ते जलमय झाले होते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. ठाणे बेलापुर मार्गवर रबाले टी जंक्शन जवळ  पाणी साचले होते. महापे सर्कल जवळील भुयारी मार्गात देखील पाणी साचण्याची घटना घडली होती.  सततधार सुरु असणाºया पाऊसामुळे रबाले येथील बस स्टॉप वर पाणी मोठया प्रमाणात साचले होते. तर नवी मुंबईतील विविध नोड मध्ये नऊ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहे.

navi mumbai rain tourism-banned year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai rain tourism-banned year