Navi Mumbai Accident
Navi Mumbai Accident sakal

Navi Mumbai Accident : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; महापे शिळफाटा मार्गावर झाला अपघात

Navi Mumbai News: महापे येथून दिवा गाव येथे जाणाऱ्या व्यक्तीला वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे.

महापे शिळफाटा मार्गावर रविवारी दुपारी हा अपघात झाला असून तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फरारी चालकावर गुन्हा दाखल आहे.

Navi Mumbai Accident
Mumbai Local News : ...अन् रिया घरी परतलीच नाही! डोंबिवलीच्या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू

ठाण्यातील दिवा गाव येथे राहणारा सौरभ सानपाडा येथील खासगी कंपनीत कामाला होता. कामावर ये-जा करण्यासाठी दुचाकीचा वापर करत होता. रविवारी सकाळी ९ च्या दरम्यान सौरभ दुचाकीवरून कामावर निघाला होता.

Navi Mumbai Accident
Mumbai Local News: समर स्पेशलमुळे लोकल सेवा विलंबाने; मुंबईकर त्रस्त

दुपारी दीडच्या सुमारास दिवा गाव येथे परतत असताना महापे शिळफाटा मार्गावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात जखमी असलेल्या सौरभला पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.

Navi Mumbai Accident
Maharashtra Din 2024 : जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणे, यंदाच्या सुट्टीत नक्की द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com