नवी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी वाढली! सायन्स पार्क २०२८मध्ये खुलणार, मुदत उलटूनही प्रकल्प अपूर्ण

Navi Mumbai Science Park: संथ कामामुळे नवी मुंबईतील सायन्स पार्क २०२८मध्ये खुले होणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांना सायन्स पार्कची सफर करण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Navi Mumbai Science Park

Navi Mumbai Science Park

ESakal

Updated on

तुर्भे : पालिकेच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'सायन्स पार्क' प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नवी मुंबईकरांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेल्या मुदती एकापाठोपाठ एक उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष काम पूर्ण झालेले नाही. आता इमारतीचे बाह्य बांधकाम पूर्ण झाले असून अंतर्गत सादरीकरणाच्या कामासाठी वर्कऑर्डर जारी करण्यात आली आहे. ते पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे हे पार्क २०२८ मध्येच नागरिकांसाठी खुले होईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com