गणेश नाईकांच्या बॅनरवर शिवसेनेचे नगरसेवक; इथं काय शिजतंय ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

नवी मुंबई : शिवसेनेतील तीन नगरसेवक फोडण्यात भाजपला यश आले आहे. शिवसेनेचे घणसोलीतील तीन नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. नगरसेवक प्रशांत पाटील, कमलताई पाटील आणि सुवर्णा पाटील अशी या तीन नगरसेवकांची नावे आहेत. घणसोलीत महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कच्या लोकार्पणाचे बॅनर घणसोलीत लावण्यात आले आहेत. या बॅनवर पाटील यांनी आपल्यासोबत आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांचे फोटो छापून आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत.

नवी मुंबई : शिवसेनेतील तीन नगरसेवक फोडण्यात भाजपला यश आले आहे. शिवसेनेचे घणसोलीतील तीन नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. नगरसेवक प्रशांत पाटील, कमलताई पाटील आणि सुवर्णा पाटील अशी या तीन नगरसेवकांची नावे आहेत. घणसोलीत महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कच्या लोकार्पणाचे बॅनर घणसोलीत लावण्यात आले आहेत. या बॅनवर पाटील यांनी आपल्यासोबत आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांचे फोटो छापून आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या संकेत दिले आहेत. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसून शिवसेनेतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले. 

मोठी बातमी - कोरोना आला मुंबईत ! मुंबईतील दोघांना कोरोनाची लागण...

महापालिका निवडणूकांच्या धर्तीवर नवी मुंबईत एकमेकांच्या पक्षातील नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला उत आला आहे. आपल्या पक्षातील जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी मातब्बर नगरसेवकांना पक्षातरांसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने भाजपचे तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासहीत आणखीन तीन जणांना फोडण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेला भाजपचे नगरसेवक फोडण्यात यश आल्यानंतर स्वकीयांकडे दूर्लक्ष केले जात असल्याची ओरड घणसोलीतील नगरसेवकांमध्ये होत आहे. पक्षांतर करून आलेल्या आयारामांना विशेष लक्ष दिले जात असल्याने पक्षातील नगरसेवकांमध्ये वरिष्ठांबाबत नाराजी व्यक्त होत आहे. घणसोलीकडे वरिष्ठ लक्ष देत नसल्यामुळे प्रशांत पाटील, कमलताई पाटील आणि सुवर्णा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. पक्षातून लक्ष देत नसल्यामुळे अखेर पाटील कुटुंबिय आता नाईकांच्या वाटेकडे वळले आहेत. घणसोली येथे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कच्या उद्घाटनांसाठी बॅनल लावण्यात आले आहेत. या बॅनरवर नाईक परिवारातील नेत्यांसोबत महापौर जयवंत सूतार यांचे फोटो झळकले आहेत. या बॅनरबाजीमुळे दिवसभर शहरात या तीन नगरसेवकांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. 

मोठी बातमी -  जोतिरादित्य शिंदेंच्या राजीनामन्यानंतर मुंबईतील 'हा' मोठा नेता देणार काँग्रेसला सोडचिठ्ठी ?

भाजपमध्ये प्रवेश करणार नसून कायमचा शिवसेनेतच राहणार आहे. बॅनरवर नाईक कुटुंबियांचे लावलेले फोटो फक्त त्यांना श्रेय देण्याचा मी केलेला प्रयत्न आहे. घणसोलीत तयार केलेल्या सेंट्रल पार्कच्या उद्घाटनाबाबत शिवसेनेच्या नेत्यांना काही पडलेली नव्हती. मात्र त्याचा त्रास लोकांना होत असल्यामुळे मी नाईकांकडे हा पार्क उद्घाटन करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन उद्घाटन कार्यक्रम करणार असल्याने त्यांना श्रेय देण्याचा प्रयत्न केला आहे. - प्रशांत पाटील, नगरसेवक 

navi mumbai shivsena corporators are on the banners of ganesh naik of bjp

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai shivsena corporators are on the banners of ganesh naik of bjp