नवी मुंबई : कॅटरर्स मालकाची गळफास घेऊन आत्महत्या | Navi Mumbai suicide cases update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

नवी मुंबई : कॅटरर्स मालकाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चेंबूर : गोवंडी (Govandi) येथील अंगण लॉन कॅटरर्सच्या मालकाने (catering owner) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (suicide) घटना बुधवारी (ता. १७) सायंकाळी घडली. प्रकाश राठोड (४२) असे या मृत व्यक्तीचे (prakash rathod) नाव आहे. राठोड हे गेल्या अनेक वर्षांपासून कॅटरिंग व्यवसाय करतात.

हेही वाचा: ...म्हणून केला प्राणघातक हल्ला; मुंबईच्या विलेपार्लेत एकावर चाकुने वार

त्यांच्याकडून चेंबूर, गोवंडी, देवनार, मानखुर्द परिसरातील अनेक राजकीय नेत्यांनी जेवणाची ऑर्डर घेतली होती; परंतु आर्ध्याहून अधिक रक्कम थकीत ठेवली होती. त्यामुळे राठोड कर्जबाजारी झाले होते. याच कर्जाच्या बोजामुळे त्यांनी बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

राठोड यांच्याजवळ पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात एकूण १० राजकीय नेत्यांनी नावे लिहून ठेवली आहे. या नेत्यांमुळेचे राठोड यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गुरुवारी गोवंडी पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी एकत्र येऊन जबाबदार असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

loading image
go to top