जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई, ठाण्यात पाण्यासाठी हाल!

शरद वागदरे
Sunday, 4 October 2020

नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणारी बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी खिडकाळी येथे फुटल्याने शनिवारी दिवसभर या शहरांतील काही भागांचा पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांचे दिवसभर पाण्यासाठी हाल झाले.

वाशी : नवी मुंबई, ठाणे आणि मिरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणारी बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी खिडकाळी येथे फुटल्याने शनिवारी दिवसभर या शहरांतील काही भागांचा पाणीपुरवठा बंद होता. परिणामी नागरिकांचे दिवसभर पाण्यासाठी हाल झाले.

हेही वाचा : परतीच्या पावसाचा मुंबईला पुन्हा दणका; चेंबूरमध्ये तासाभरात 57 मिमी पावसाची नोंद

शुक्रवारी रात्री या जलवाहिनीला तडा गेला. शनिवारी दिवसभर तिच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. रात्री 12 वाजेपर्यत हे काम पूर्ण होण्याचा अंदाज एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एम एस कळकूटकी यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा : कॉक्‍स ऍण्ड किग्सच्या संचालकांविरोधात गुन्हा; 174 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

रविवारी सकाळपासून एमआयडीसीचीचा पाणीपुरठा सुरळीत होणे अपेक्षित आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील दिघा, ठाण्यातील कळवा, ठाणे पूर्व आणि मिरा भाईंदरमधील काही भागांत एमआयडीसीचा बारवी धरणातून पाणी पुरवठा होता.
--------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai, Thane in dire need of water due to bursting of main canal of Barvi Dam!