नवी मुंबईत १६ किलो सोन्याची ‘फिल्मी’ लूट! भररस्त्यात चौघांचा दरोडा; प्रतिकार करणाऱ्या चालकावर रॉडने प्रहार

Navi Mumbai Theft Case: नवी मुंबईत १६ किलो सोन्याची फिल्मी स्टाईलने लूट करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावेळी सोन्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून चौघा लुटारूंनी २० कोटी रुपयांचे सोने लुटून पलायन केले.
Navi Mumbai theft case

Navi Mumbai theft case

ESakal

Updated on: 

नवी मुंबई : नेरूळ एमआयडीसी परिसरात सोन्याच्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर हल्ला करून तब्बल २० कोटी रुपयांचे सोने लुटल्याची घटना गुरुवारी (ता. २६) रात्री घडली. कारमधून आलेल्या चौघा लुटारूंनी लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर १६ किलो ४०० ग्रॅम सोन्याची बॅग हिसकावून ठाण्याच्या दिशेने पलायन केले.

Loading content, please wait...