Navi Mumbai Crime
esakal
पीडित तरुणी आणि आरोपीची ओळख १५ ऑगस्टच्या कार्यक्रमात झाली होती.
आरोपीने फिरवण्याच्या बहाण्याने बंद कंपनीत नेऊन अत्याचार केला.
आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी (Turbhe MIDC) परिसरात एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीड महिन्यापूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडितेने ही बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे (Navi Mumbai Crime) तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.