नवी मुंबई : उरणच्या गोठवणे गावात दोन गटात तुंबळ हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

नवी मुंबई : उरणच्या गोठवणे गावात दोन गटात तुंबळ हाणामारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : उरण तालुक्यातील गोठवणे गावातील दोन गटांत झालेल्या हाणामारीत पाच जण गंभीर जखमी झाले. या घटनेत दोन्ही गटांतील जमावाने एकमेकांवर तलवार, चाकू, लोखंडी कांब आणि कोयत्यांनी हल्ला चढवला. याप्रकरणी उरण पोलिसांनी दोन्ही गटांतील ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: Movie Review; 'नुसतचं भांडण नको, संवादही हवा'; Meenakshi Sundareshwar

गावातील म्हात्रे आणि गावंड कुटुंबीयांत गेली काही वर्षे वाद सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून रविवारी मध्यरात्री दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी हल्ला चढवला. यात पाच जण जखमी झाले. जखमींवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

loading image
go to top