

ACB Action In APMC Market
ESakal
जुईनगर : एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरात उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यातून सडलेला आणि टाकाऊ भाजीपाला निवडून, तो पुन्हा पिशव्यांमध्ये भरून किरकोळ बाजारात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.