.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
वाशी : नवी मुंबई पालिका क्षेत्रातील जलवाहिन्यांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे शहरातील बहुतांश भागांत सलग २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी (ता. १३) सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवारी (ता. १४) सकाळी १० वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.