
नवी मुंबई : रिल्स बनवण्याच्या नादात जीव गमावण्याची किंवा आयुष्यभराची जखम घेऊन जगण्याची वेळ तरुणाईवर येऊ लागली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ रविवारी दुपारी घडली आहे. रेल्वे गाडीवर चढून रील शूट करताना १६ वर्षीय आरव श्रीवास्तव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्याची स्थिती गंभीर पण स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.